देशात गहू, तांदळाचा साठा बफर स्टॉकपेक्षा जास्त

कृषी लक्ष्मी I ३० नोव्हेंबर २०२२ I केंद्र सरकारकडे गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. येत्या एप्रिलपर्यंत देशात संरक्षित साठ्याच्या म्हणजे बफर स्टॉकच्या तुलनेत अधिक साठा उपलब्ध असेल. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती दिली.

 

१५ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे २०१ लाख टन गव्हाचा साठा आहे. तर १४० लाख टन तांदूळ साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत आपल्याकडे किती साठा असेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२३ रोजी गव्हाचा अंदाजे साठा ११३ लाख टन असेल. बफर स्टॉकसाठी ७५ लाख टन गव्हाचा साठा अपेक्षित आहे. तर १ एप्रिल रोजी सरकारकडे तांदळाचा अंदाजित साठा २३७ लाख टन असेल. बफर स्टॉकसाठी १३६ लाख टन तांदूळ लागतो. थोडक्यात गहू आणि तांदूळ या दोन्हींचा साठा बफर स्टॉकपेक्षा जादा असेल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.