साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार

कृषी लक्ष्मी I १ डिसेंबर २०२२ I आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफ. आर पी चा कायदा रद्द करून एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे, वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे.आदींची पूर्तता करणार आहे.