सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय

कृषी लक्ष्मी I १ डिसेंबर २०२२ I ग्रामपंचायत निवडणुका आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकत्र येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

यामध्ये ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे.१८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील सात हजार ७५१ सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये अ वर्गातील ३८, ब वर्गातील ११७९, क वर्गातील ३१५१ आणि ड वर्गातील २७८८ सहकारी संस्थांचा समावेश होता. मात्र, राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या कालावधीत होत असल्याने गावागावांत तणाव निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.