यंदा ज्वारीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज

कृषी लक्ष्मी I ११ डिसेंबर २०२२ I बदलत्या वातावरणामुळे जगाला पाऊस, दुष्काळ, पूर आणि वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत असून कमी पावसात आणि पौष्टीक असलेल्या ज्वारीला महत्व येत आहे. जगात ज्वारीचा आहारात, पशुखाद्यात आणि जैवइंधनासाठीही वापर होतो. मात्र देशात यंदा पावसाने ज्वारी उत्पादनाचे गणित बदलेले आहे.

 

त्यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. कोरोनाकाळात लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्व कळाले. त्यामुळे या पिकांना मागणी वाढले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२-२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष जाहीर केले आहे. भरडधान्यामध्ये ज्वारीला जास्त महत्व वाढणार आहे.