कांद्याला प्रतिक्विंटल ९५० रुपये ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर
कृषी लक्ष्मी I १० डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर नरमलेलेच आहेत. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम कांदा दरावर दिसून येत आहेत. मात्र एका महिन्यात दर जवळपास निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ९५० रुपये ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत दर वाढू शकतात, अशी माहिती भाजीपाला बाजारातील जाणकारांनी दिली.