बदलत्या हवामानामुळे राज्यात पावसाची शक्यता
कृषी लक्ष्मी I ११ डिसेंबर २०२२ I दक्षिण भारत व महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ ते १०१० हेप्टापास्कल पर्यंत कमी होत आहेत. हवेचे दाब आठवडाभर तितकेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आग्नेयेकडून व नैर्ऋत्येकडून समुद्रावरून येणारे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील.
हवेचे दाब कमी होतील तिथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात वातावरणबदल जाणवतील. बाष्पाचे प्रमाण वाढून ढगनिर्मिती होऊन पाऊस होईल. डिसेंबर महिना अतिथंडीचा महिना असूनही अशी विरुद्ध स्थिती पाहायला मिळेल.