शरिर सौष्ठव स्पर्धेत राज मोरेने पटकाविले सुवर्णपदक

कृषी लक्ष्मी I २६ डिसेंबर २०२२ I डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतीम वर्षांतील विद्यार्थी राज मोरे ह्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव या ६५ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकाविले.

आंतर विद्यापीठ स्पर्धा कर्नाटक येथील ाशपसपसश्रेी विद्यापीठ साठी निवड झाली. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ शैलेश तायडे, कृषी अभियंत्रिकीचे प्राचार्य डॉ पूनमचंद सपकाळे व प्राचार्य डॉ एस् एस राठी तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले. त्याला प्राध्यापक आर. डी. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.