सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर

कृषी लक्ष्मी I २७ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सोयाबीनचा भाव (जवळपास एक महिन्यापासून स्थिर आहेत. देशातून सोयापेंड निर्यात कशी होते आणि सोयातेलाचे भाव काय राहतात? यावर सोयाबीनचा बाजार अवलंबून आहे. सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर मागील एक महिन्यापासून आहे. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत.