कृषी महोत्सवात 5 कोटी जमा करण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश

कृषी लक्ष्मी I २६ डिसेंबर २०२२ I सिल्लोड मतदार संघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी खात्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधी रुपयांची वर्गणी गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना पाच कोटी रुपयांची वर्गणी जमा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या वर्गणीसाठी चार प्रकारच्या हजारोंच्या प्रवेशिका तयार करण्यात आल्या आहेत. यामधून पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच कृषी महोत्सवात प्रवेशासाठी चार प्रकारचे व्हीआयपी पासेस तयार करण्यात आले आहेत. यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. याच्या प्रवेशिका सर्व जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत