मक्याला मिळतोय दोनशे रुपयांनी कमी दर

कृषी लक्ष्मी | १२ नोव्हेंबर २०२२ | सध्या मक्याची काढणी सुरू आहे. पण शेतकरी काढणी केल्या केल्या ओला मिका विकत आहेत. त्यामुळे रेट कमी बसतोय. शेतकऱ्यांनी ओला मका विकू नये, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. . व्यापारी सध्या २२ टक्के मॉईश्चरचा ओला मका प्रति क्विंटल १६०० रूपयांनी खरेदी करू लागले आहेत. . याच मक्यातलं मॉईश्चर १४ टक्के झालं तर वजन साधारण दहा टक्के घटेल. म्हणजे उरतो ९० किलो मका. त्याचा भाव दोन हजार रुपये आहे. थोडक्यात दोनशे रूपयांचा फरक बसतोय. म्हणजे काय शेतकऱ्यांनी हाच मका कोरडा करून आणला तर त्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपयांचा फायदा होईल. मक्याचे ताट कडकडीत वाळल्यानंतरच कापणी करा. पुढे उन्हांत कणसे वाळू द्या. नैसर्गिकरित्या मॉईश्चर १४ टक्क्यापर्यंत कमी होते, अशी माहिती जाणकारांनी दिली.