काबुली हरभरा दरात वाढ

कृषी लक्ष्मी | २२ नोव्हेंबर २०२२ | देशात सध्या काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याचे उत्पादन मागील रब्बी हंगामात कमी झाले होते. त्यातच निर्यातही चांगली झाली. त्यामुळं काबुली हरभऱ्याचा देशात तुटवडा जाणवत आहे. तर देशात सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याला सध्या प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार ५०० रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याचे हे दर नवीन माल बाजारात येईपर्यंत टिकून राहू शकतात, असा अंदाज प्रक्रिया उद्योगांकडून व्यक्त केला जात आहे.