ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर

कृषी लक्ष्मी | २२ नोव्हेंबर २०२२ | देशात यंदा परतीचा पाऊस लांबला होता. त्यामुळं ज्वारी पेरणीला उशीर होतोय. परिणामी अनेक भागात शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकाला पसंती दिल्याचं दिसतं. त्यामुळं यंदाच्या रब्बी हंगामात देशातील ज्वारी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आत्तापासून देशातील ज्वारीच्या दरावर दिसतोय. त्यातच सध्या ज्वारीची आवक कमी आहे. त्यामुळं ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.