महापशुधन संजीवनी सुविधा

कृषी लक्ष्मी | २१ नोव्हेंबर २०२२ | प्रत्येक पशुपालकाचा आपल्या मुक्या जनावरांत लई जीव असतो. पशुधनाला वेळेवर लसीकरण तसेच वैद्यकीय मदत मिळावी ही बाब लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्र सरकारने महापशुधन संजीवनी सुविधा सुरू केली आहे.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत महापशुधन संजीवनी सुविधा सुरू झाली आहे.

पशूसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि भारत फायनान्सिअल इंकलूजन ली. ( इंडस इंड बँकेचा सी एस आर ) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
“पशू पक्ष्यांच्या आजारावर उपचार, पशुपालकाच्या दारोदार” या टॅग लाईन खाली ही सुविधा सुरू आहे.

या सुविधेची वैशिष्ट्ये –

घरपोच पशू वैद्यकीय सेवा
पहिल्या टप्प्यात राज्यातील ३१ जिल्ह्यातील ७३ तालुक्यात घरपोच सुविधा
फिरता पशू वैद्यकीय दवाखाना, अनुभवी डॉक्टर
प्राणी आरोग्य आणि आहार संबधी पशू पालकांना योग्य सल्ला
गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी, घोडा इत्यादी पशुचे लसीकरण, खच्चीकरण, कृत्रिम गर्भधारणा इत्यादी सेवा घरपोच.

महापशुधन संजीवनी सुविधा लाभ घेण्याकरिता १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

महापशुधन संजीवनी सुविधेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा.