मक्याच्या दरात घसरण

कृषी लक्ष्मी I २७ डिसेंबर २०२२ I गेल्या हंगामात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवठ्यात अडचणी होत्या. त्यामुळे मका दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मक्याने २ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला होता.

मात्र त्यानंतर दर कमी होत गेले. तसंच यंदा सरकारने खरिपातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटलंय. पण शेतकऱ्यांनी यंदा मका पिकाला पावसाचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं. त्यामुळं खरिपातील मका उत्पादन सरकारचा अंदाज असलेल्या २३ लाख १० हजार टनांवर पोचणार नाही, असंही शेतकरी सांगत आहेत.