कापसाच्या दरात किंचित घट

कृषी लक्ष्मी I ४ डिसेंबर २०२२ I चीनची बाजारपेठ पुन्हा खुली होण्यास सुरुवात झाल्यानंतर कापसाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच भारतातील कापसाचे दर एका भावपातळीवर भोवती फिरत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र काल कापसाचे दर जवळपास पाच टक्क्यांनी तुटले होते. तर देशातील वायदेही दीड टक्क्याने कमी झाले होते. आजही देशात कापूस दर क्विंटलमागे १०० रुपयाने नरमले होते. मात्र पुढील काळात कापसाचे दर पुन्हा सुधारू शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असे आवाहन बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.