मुगाला ६ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर

कृषी लक्ष्मी I ४ डिसेंबर २०२२ I केंद्राने ४ लाख टन मूग हमीभावाने खरेदीला मान्यता दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात आणि ओडिशात ही खरेदी होणार आहे. केंद्राने यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या खुल्या बाजारात मुगाला ६ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळत आहे. आता सरकारी खरेदीमुळे मुगाच्या बाजाराला आधार मिळणार आहे. त्यामुळे मुगाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.