परभणी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे २२१ जनावरे दगावली
कृषी लक्ष्मी I २४ डिसेंबर २०२२ I परभणी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे बाधित जनावरांची संख्या गुरुवार (ता. २२) पर्यंत ३ हजार २१४ पर्यंत वाढली. त्यापैकी २२१ जनावरे दगावली असून, त्यात गायी ३०, बैल ७१, वासरे १२० यांचा समावेश आहे.
उपचारानंतर १ हजार ८७६ जनावरे बरी झाली आहेत. सध्या या आजाराच्या १ हजार ११७ सक्रिय जनावरांपैकी ६१ जनावरे गंभीर आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ पैकी ३५७ गावांतील १ हजार २७१ गायी आणि १ हजार ९४३ बैलांना या आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची ईपी सेंटर १४२ आहे. ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६१८ झाली आहे.