जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी

कृषी लक्ष्मी I २४ डिसेंबर २०२२ I अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला. असे असताना आता शेतकरी पुन्हा एकदा सावरत आहे. आता जळगाव जिल्ह्यात केळीला उच्चांकी दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी आहे. एक नंबर निर्यातक्षम केळीला 2500 रुपये तर दोन नंबर केळीला 1500 ते 1800 इतका उच्चांकी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असे असताना केळीवरील वाढता उत्पादन खर्च पाहता आणि संकट पाहता असाच भाव वर्षभर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे. काळी माती, उष्ण तापमान व शेणखताचा वापर यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची चव जगातील कोणत्याही केळीपेक्षा वेगळी आहे.