ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख गाठी आयात

कृषी लक्ष्मी | 30 डिसेंबर २०२२ | सध्या भारतीय बाजारपेठेत कापसाच्या दराबाबत चढउतयार आहे. दर जानेवारीत वाढतील, असेही म्हटले जात आहे. असे असताना ऑस्ट्रेलियाकडून तीन लाख (एक गाठ १७० किलो रुई) गाठी अर्थात ५१ हजार टन कापूस आयात (Cotton Import) करणार आहे. केंद्र सरकारच्या आयातीबाबतच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांसह संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

कापूस आयातीवर लागू असलेले ११ टक्के शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. भारतातून कापूस किंवा रुई व सुताची निर्यात ठप्प आहे. अशातच परदेशातून कापूस आयात करण्यासंबंधीची कार्यवाही चुकीची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यामुळे येणाऱ्या काळात यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

भारतीय कापूस दर जागतिक बाजाराच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहेत. अशा संघटनांची पत्रकबाजी आणि कापूस उत्पादन, गरज याबाबत चुकीची माहिती, अहवाल सादर करण्याचे उद्योग यामुळेच की काय केंद्राने कापूस आयातीसंबंधी व्यापारी पूरक धोरण आखले आहे की काय, असा प्रश्न शेतकरी नेत्यांनी उपस्थित केले आहेत.