कापसाच्या दरात झाली सुधारणा
कृषी लक्ष्मी । ३१ डिसेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ-उतार सुरु आहेत. चालू आठवड्यात वायदेबाजारात त्याचे पडसाद उमटले. आज कापसाचे वायदे दुपारपर्यंत ८३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. मात्र देशात कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री एकदम कमी केली. त्याचा परिणाम दरावर झाला.
काही बाजारांत कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. देशात आज कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपये क्विंटल दर मिळाला. पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज आहे.