सोयाबीन दर क्विंटलमागे २०० रुपयांनी घटले

कृषी लक्ष्मी | १७ नोव्हेंबर २०२२ | देशातील बाजारात आज सोयाबीन दर क्विंटलमागे २०० रुपयाने तुटले होते. प्लांट्सच्या दरातही आज २०० ते २५० रुपयांची घसरण झाली होती. देशातील सोयाबीनचा सरासरी दर आज ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात जवळपास एक टक्क्यांनी घट झाली होती. त्याचे पडसाद देशातही उमटले. मात्र देशातील सोयाबीनचा बाजार किमाल ५ हजार तर कमाल ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.