शेतकऱ्यांसाठी राज्यात राबविला जातोय स्मार्ट कॉटन प्रकल्प
कृषी लक्ष्मी I १४ डिसेंबर २०२२ I स्मार्ट कॉटन या प्रकल्पामध्ये एक गाव एक वाण याप्रमाणे एका गावातील शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करावी. जेणेकरून या प्रयोगातून एकाच दर्जाचा निर्यातक्षम कापूस उत्पादित होईल व शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. त्यामुळे या दृष्टिकोनातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 35 तालुक्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सध्या हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यात राबवला जात असून या जिल्ह्यातील कारंजा, आष्टी आणि देवळी या तालुक्यातील तब्बल 45 गावांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर प्रकल्प हा कॉटन फेडरेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे.