कुंभी साखर कारखान्यामध्ये साखर पोत्यांचे पूजन
कृषी लक्ष्मी | १९ नोव्हेंबर २०२२ | कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी साखर कारखान्यामध्ये पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी हंगामात १ लाख २३ हजार क्विंटल साखर निर्यात कोटा मिळाला असून, केंद्र शासनाने ओपन जनरल लायसनखाली साखर निर्यातीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
नरके म्हणाले, ७८ हजार टन ऊस गाळप झाला असून, ७७ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा साडेदहा टक्के राहिला आहे. या हंगामात एफआरपी ३१००रु. एकरकमी देणार आहे. केंद्राने ६० लाख टन साखर कोटा निर्मितीसाठी मंजूर केला आहे. यातून महाराष्ट्राला २०.१३ लाख टन, तर कुंभीला १ लाख २३ हजार ५६० क्विंटल साखर निर्यात कोटा मिळाला. हा कोटा विक्री केला आहे. साखर निर्यातीचा फायदा उत्तर प्रदेशमध्ये होतो. केंद्रने शासनाने इतर राज्यांचे हित न बघता ओपन जनरल लायसनखाली साखर निर्यातीची परवानगी द्यावी, आशी मागणी केली.