शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना

कृषी लक्ष्मी | २० नोव्हेंबर २०२२ | पशुपालन हा एक जोडधंदा म्हणून पहिले जायचे परंतु नवीन पिढी याकडे एक नवीन उद्योगधंदा म्हणून पाहत आहे तर आज आपण पशुसंवर्धन विषयी काही माहिती आणि सरकारी योजना काय आहेत ते जाणून घेऊया.

विशेष घटक योजना

विशेष घटक योजना हि समाजातील विशेष घटकातील लोकांसाठीची योजना आहे जसे कि नवबौध्द बांधव किंवा अनुसूचित जातीतील बांधवांसाठी राबविली जाते .हि योजना ७५% अनुदानावर राबविली जाते तसेच यात २५% हिस्सा हा लाभार्थी हिस्सा असतो .

या योजनेसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज भरू शकतात .

१) दुधाळ गट वाटप -या योजनेमध्ये २ दुधाळ गाई किंवा २ म्हशी यांचा समावेश आहे .२)शेळी गट योजना – शेळी गटामध्ये १० शेळी व १ बोकड असे या योजनेचे स्वरूप आहे .👇सन २०११-१२ पासून नाविन्यपूर्ण योजना हि सुरु करण्यात आलेली आहे

.हि योजना ३ भागामध्ये विभागली आहे

१)शेळी गट- या गटामाडे १० शेळी व १ बोकड अशा स्वरूपामध्ये हि योजना राबवली जाते .

२) दुधाळ गट -दुधाळ गटामध्ये २ संकरित गाई किंवा २ म्हशी याप्रकारे हि योजना राबवली जाते .

३)कुक्कुटपालन -कुक्कुटपालनामधें १००० मांसल पक्षी याप्रमाणे या योजनेत समावेश होतो .वरील सर्व योजना ह्या अनुसूचित जाती / जमाती यांसाठी ७५ % अनुदान या तत्वावर राबवल्या जातात तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० % अनुदानावर राबवल्या जातात .

हि योजना एस. टी. प्रवर्गासाठी राबवली जाते .हि योजना अनुसूचित जाती/जमाती यांसाठी ७५% अनुदानावर राबवली जाते .यामध्येसुद्धा २५% लाभार्थी हिस्सा असतो .या योजनेमध्ये तुम्ही २ प्रवर्गाकडे अर्ज भरू शकता

१)दुधाळ गट – दुधाळ गटामध्ये २ संकरित गाई /देशी गाई /२ म्हशी असे या योजनेचे स्वरूप आहे .

२)शेळी गट
शेळी गटामध्ये १० शेळी व १ बोकड अशाप्रकारे हि योजना आहेपशुसंवर्धन विभाग विशेष घटक योजना साठी विशेष सामूहिक चर्चासत्राचे देखील आयोजन करते .यामध्ये ३ दिवसाचे प्रशिक्षण असते .तज्ज्ञ पशुवैद्यक यामध्ये पशुपालनाविषयी पशुपालकांना मार्गदर्शन करतात.वैज्ञानिक माहिती सांगतात .