जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान
कृषी लक्ष्मी I ८ डिसेंबर २०२२ I जिल्हा दूध संघाची निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १०) मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे असतील. एकूण ४४१ मतदार या केंद्रांवर मतदान करतील. मतदान केंद्रात मतदानाची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मतदान केंद्रे व कंसात मतदारसंख्या अशी : अमळनेर, चोपडा तालुक्यांसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदान केंद्र असेल (मतदार ७८), भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांसाठी भुसावळ येथील जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मतदान केंद्र असेल (४४)छत्री चौक, फैजपूर (ता. यावल) (६०), जळगाव, जामनेर तालुक्यांसाठी श्री सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी, रिंग रोड, जळगाव (५७), पाचोरा, भडगाव तालुक्यांसाठी श्री. गो. से. हायस्कूल, गिरड रोड, पाचोरा (७६). मतमोजणी रविवारी (ता. ११) श्री सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी, रिंग रोड, जळगाव येथे सकाळी आठला सुरू होईल.