मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर

कृषी लक्ष्मी I २२ डिसेंबर २०२२ Iदेशातील बाजारात सध्या नव्या मुगाची आवक होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमधील बाजारात सध्या आवक अधिक दिसतेय. मात्र दर हमीभावापेक्षा कमी आहेत.

 

केंद्र सरकारने यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात मुगाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. पुढील काही दिवस मुगाचे हे दर कायम राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.