कापसाला ८ हजार १०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर

कृषी लक्ष्मी I २२ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आजही सुधारणा पाहायला मिळाली. कापसाच्या वायद्याने ८८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला. मात्र देशातील दर स्थिर आहेत.

देशात सध्या कापसाला ८ हजार १०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. सध्या बाजारातील आवक कमी असून शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.