येत्या १५ दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार निधी- अब्दुल सत्तार

कृषी लक्ष्मी I २८ नोव्हेंबर २०२२ I कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, “यंदा विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी जवळपास 12 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच मदतीचे वाटप करण्यात येत आहे. तर येत्या 15 दिवसात सर्व मदतीचे वाटप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात येईल.” आता या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.

ज्या ज्या वेळी राज्यातील शेतकरी नुकसानीला किंवा विविध संकटांना सामोरे जात असतात. त्या त्या वेळी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करण्यात येते. यंदा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची हीच आर्थिक (पोकळी पूर्ण करण्यासाठी सरकार धडपड करत आहे. तसेच या नुकसान भरपाईपासून राज्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आश्वासन देखील राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारयांनी शेतकऱ्यांना दिले आहे.