खतांच्या किंमती वाढल्या
कृषी लक्ष्मी । १ जानेवारी २०२३ ।राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आता मोठ्या प्रमाणावर सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी गहु, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली आहे.
तसेच भाजीपाल्याचाही लागवड केली आहे. देऊळगांवराजामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. असे असताना खताच्या किंमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे येणारे वर्ष देखील शेतकऱ्यांना सुगीचे जाणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.
यावर्षी रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. रासायनिक खतांचे भाव वाढल्याने खतांचा वापर निम्म्याने घटला आहे. पेरणी झाल्यानंतर पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खतांची शेतकर्यांना आवश्यकता असते.