कांद्याला मिळतोय सरासरी १३०० रुपये भाव

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I कांद्याने पुन्हा एकदा उत्पादकांची गोची केली. कांद्याचे दर मागील महिन्यात सरासरी २ हजार रुपयांवर पोचले होते. मात्र त्यात घसरण होऊन कांदा दर आता सरासरी १३०० रुपयांपर्यंत आले.

 

एकिकडे उत्पादन घटूनही बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र झालं उलटच. दर पडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.