५ हजार २०० बायोगॅस संयंत्रे उभारणार

कृषी लक्ष्मी I ९ डिसेंबर २०२२ I राज्य सरकारने अपारंपरिक स्रोतांचा लाभ घेऊन पर्यावरण संतुलन राखण्याचे धोरण ठरवले आहे. त्यानुसार आता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस सयंत्र उभारले जातात.
आता राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून राज्यात हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत या वर्षात ५ हजार २०० बायोगॅस संयंत्रे (Biogas Plant) उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

जिल्हा कृषी विभागातर्फे यंदा राज्यात ५ हजार २०० बायोगॅस संयंत्रे उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. यामध्ये त्यात सर्वाधिक संयंत्रे कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत होणार आहेत. यामुळे याचा फायदा होणार आहे.