कडकनाथ कुक्कुटपालनाला मध्य प्रदेश सरकारकडून प्रोत्साहन
कृषी लक्ष्मी | १९ नोव्हेंबर २०२२ | कडकनाथ कोंबडीची वाढती मागणी लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आक्रमक मार्केटिंग सुरू केलं होतं. अनेक शेतकरी त्या कंपन्यांशी जोडले गेले होते. परंतु नंतर कंपन्यांनी हात वर केल्याने हे शेतकरी अडचणीत आले. परंतु शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये मात्र राज्य सरकार कडकनाथ कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देत आहे. तिथे आदिवासी महिलांसाठी कडकनाथ संगोपन युनिट उभारण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. शेड बांधकाम, भांडी, धान्य, १०० पिल्ले व तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सरकार मदत करत आहे. कडकनाथ कोंबडीची त्वचा, पंख, मांस, रक्त हे सर्व काळे असते. मांसामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदयरोग आणि मधुमेही रुग्णांसाठी कडकनाथ कोंबडीचे मांस फायदेशीर मानले जाते. त्यामुळे इतर कोंबड्यांच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्यांचे मांस आणि अंडी खूपच महाग विकली जातात.