अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस

कृषी लक्ष्मी I १६ डिसेंबर २०२२ Iअकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. प्रामुख्याने अकोला, बुलडाणा, चिखली, मलकापूर, साखरखेर्डा या भागात पावसाने हजेरी लावली.हवामान विभागाने दिलेला अवकाळी पावसाचा इशारा खरा ठरला.
या अवकाळी पावसाचा गहू आणि हरभरा या पिकांना काहीसा फायदा होईल. तर तुरीच्या पिकावर किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. तुरीच्या शेंगामध्ये अळीचा हल्ला वाढू शकतो. तर घाटे अवस्थेत असलेल्या हरभरा पिकालाही या वातावरणामुळे नुकसान संभव्यते.