सीताफळला ३०० ते ४०० रुपये डझन मिळतोय दर
कृषी लक्ष्मी | १८ नोव्हेंबर २०२२ | राज्यात अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला यामुळे कधी कशाला बाजार येईल, सांगता येत नाही. यामुळे कधी शेतकरी तोट्यात जातो तर कधी लखपती होतो. असे असताना आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत.
यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आले आहे. यामुळे यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात. मात्र आता ती खाणे परवडत नाही. यामुळे मात्र शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
परतीच्या जोरदार पावसाने फळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सीताफळांचे दर हे 300ते 400 रुपये डझन झाले आहेत.बऱ्याच ठिकाणी किलोप्रमाणे न विकता डझनने विक्री होत असून 400 रुपये डझन भाव आहे. पहिल्यादाच याचे दर वाढल्याने राहिलेल्या मालाचे चांगले पैसे होणार आहेत.