सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ केंद्रांवर भातखरेदी सुरू
कृषी लक्ष्मी I १९ डिसेंबर २०२२ I किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत अवघी ७ हजार ७१८ क्विंटल खरेदी झाली आहे. धीम्या गतीने ही खरेदी सुरू आहे. अजूनही १७ केंद्रांवर भातखरेदी सुरू झाली नसल्याची स्थिती आहे.किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जिल्ह्यात भातखरेदी सुरू झाली आहे. या वर्षी शासनाने प्रतिक्विंटल २०४० रुपये दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षी १९९० रुपये दर होता. गेल्या वर्षी २८ भातखरेदी केंद्रांना शासनाने मंजुरी दिली होती. या केंद्रांवर पूर्ण हंगामात ८९ हजार क्विंटल भातखरेदी झाली होती.आतापर्यंतच्या हंगामातील ही सर्वांत मोठी खरेदी होती.दरम्यान, या वर्षी शासनाने ३८ भातखरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यातील २१ केंद्रांवर आतापर्यंत खरेदी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून भातखरेदी केली जाते. भातविक्रीला अजूनही थंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ ७ हजार ७१८ क्विंटल भात खरेदी झाली आहे. येत्या आठ दिवसांत खरेदी अधिक जलदगतीने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.