शेती क्षेत्रातील महिलासाठी ३६७ कोटींची तरतूद

कृषी लक्ष्मी I २९ डिसेंबर २०२२ Iओडीशा राज्य सरकारने शेती क्षेत्रातील महिलासाठी ३६७ कोटींची तरतूद केली आहे. मंगळवारी (ता.२७) मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ओडीशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, “राज्यातील शेती क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि राज्यातील मशरूम उत्पादनात दुप्पटीने वाढ करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. तसेच फूल शेतीलाही प्रोत्साहन या योजनेतून देण्यात येणार आहे.” ओडीशामध्ये मशरूमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मशरूम शेतीत महिलांची कामे अधिक असतात. त्यामुळे ओडीशा सरकारने ही तरतूद केली आहे.

राज्यातील महिलांना शाश्वत रोजगार मिळावा. त्यामुळे त्यातून महिला आत्मनिर्भर बनतील. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या बटन मशरूम आणि फुलांची निर्यातही करण्यात येणार असल्याचा निर्णय ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सरकारने घेतला आहे.