कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I देशात या आठवड्यातही गहू लागवडीत वाढ झालीय. कृषी मंत्रालयाच्या २५ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील गहू पेरा १०.५ टक्के वाढलाय. देशात यंदा आतापर्यंत १५२ लाख ८८ हजार क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३८ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरा झाला होता. प्रमुख गहू उत्पादक राज्यांपैकी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षेत्र वाढलं आहे. त्या पाठोपाठ राजस्थान, पंजाब, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. फक्त हरियाणामध्ये गहू पेरा घटलाय. यंदा हवामान गहू लागवडीसाठी अनुकूल आहे. लवकर पेरणी गहू पिकाच्या पथ्यावर पडली आहे.