कृषी लक्ष्मी | १३ नोव्हेंबर २०२२ | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून तीन व्यापाऱ्यांच्या मालकीच्या ८७ हजार ४८० रूपये किंमतीच्या ज्वारीने भरलेल्या ३९ गोण्या दोन जणांनी वाहनातून चोरून होते. या गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी वरणगाव येथून अटक केली आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजार समितीच्या आवारात रमेश माळी (वय-५८), विनायक राणे आणि सुनील जाखेटे यांचे धान्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर ३९ ज्वारीच्या गोण्या लावलेल्या होत्या. शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सय्यद कमर अली (वय-५५) आणि फारुख अब्दुल रज्जाक कच्ची (वय-५६) रा. वरणगाव ता.भुसावळ यांनी पिकअप व्हॅन (एमएच ०४ ईएल ८३०२) या वाहनाने वाहनातून ८७ हजार ४८० रूपये किंमतीच्या ३९ ज्वारीच्या गोण्या चोरून नेल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सैय्यद कमर अली, वय 55 , फारुख अब्दुल रज्जाक कच्छी, वय 56 , राहत अली सैय्यद कमर अली, वय 23 सर्व रा. अक्सा मशीद जवळ, अक्सा नगर, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव यांना अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे