कृषी लक्ष्मी । ३ जानेवारी २०२३ । मावशीला जमिन मिळावी म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेतले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जालना जिल्ह्यातील हलस याठिकाणी ही घटना घडली आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. सुनील जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. यामुळे ते नाराज झाले. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्याने शेतकऱ्याने अखेर स्वतःला जमिनीत गाडून घेतले. त्यांनी प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना न्याय मिळणार का हे लवकरच समजेल.