कृषी लक्ष्मी I १० डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे. त्याचा दरावर दबाव आल्याचं दिसतं. हिरव्या मिरचीचे दर क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयाने कमी झाले.
सध्या राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार २०० रुपये ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. हिरव्या मिरचीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, अशी शक्यता भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.