कृषी लक्ष्मी I २ डिसेंबर २०२२ I गेल्या काही दिवसांपासून ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. अखेर एकरकमी एफआरपी बाबत निर्णय झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना हे FRP चे पैसे एका महिन्याच्या आत मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई होणार असल्याचे वक्तव्य सहकारमंत्री अतुल सावे यांनी केलं.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना FRP चा पैसा एक महिन्यात मिळाला पाहिजे असा आदेश साखर आयुक्तांना दिला असल्याची माहिती सावे यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही साखर कारखानदारांमधील हवेतील अंतराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना काल दिले होते.कापणी व वाहतुकीचे निकष ठरवताना पुढील हंगामापासून वजनकाट्यासाठी डिजिटल वजन काटे सुरू करावेत, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.