गव्हाचे बाजार भाव तेजीत राहतील

कृषी लक्ष्मी I १४ डिसेंबर २०२२ I गहू पिकाचा विचार केला तर हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून भारतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड ही रब्बी हंगामात केली जाते. गहू हे आहारातील एक प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे बाजारपेठेत देखील गव्हाला चांगली मागणी असते.

 

या पार्श्वभूमीवर गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून म्हणजे यावर्षी देखील गव्हाचे बाजार भाव तेजीत राहतील असा एक अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. जर आपण मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी गव्हाच्या बाजारभावाचा विचार केला तर तो 2300 रुपये प्रति क्विंटल इतका होता.

परंतु आता त्यामध्ये तब्बल सहाशे रुपयांची वाढ होत 2900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात आहे. त्यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसून येत आहे. परंतु हे दर किती दिवस टिकतील याबाबतीत जाणकारांचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते जोपर्यंत सरकार खुल्या बाजारामध्ये गहू उतरवत नाही तोपर्यंत दर कमी होणार नाही. त्यामुळे यावर्षी गव्हू शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा करून देईल हे निश्चित.