कृषी लक्ष्मी | १६ नोव्हेंबर २०२२ | राज्यात संत्री पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, कधी अवकाळी पाऊस अश्या अनेक संकटाना शेतरकऱ्याना सामोरे जावे लागते सरकारने २०२२ मध्ये संत्रा फळपिकासाठी हि योजना अधिसूचित जिल्हा अधिसूचित तालुक्यासाठी तसेच अधिसूचित महसूल मंडळात राबवण्यात येणार आहे. संत्रा३ वर्ष पूर्ण झालेल्या उत्पादन क्षम बागेस विमा संरक्षण राहणार आहे.
जाणून घेऊ थोडक्यात कालावधी आणि प्रमाणके –
१ ) संरक्षण प्रकार -हवामान धोके , नुकसानभरपाई प्रति हेक्टरी.
२ ) पाऊस – १५ जून ते १५ जुलै दरम्यान कमी पाऊस १२४ मि.मी ते १५० मि.मी झाल्यास १२०००.रुपये
३ ) १६ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान पाऊस नाही झाल्यास म्हणजेच १५ ते २१ दिवसांनतर (पाऊस खंड ) तापमान हे सलग ३ दिवस ३५ अंश सेल्सिअस त्यापेक्षा जास्त राहिल्यास १८,००० रुपये
४ ) सलग १५ ते २४ दिवस पाऊसाचा खंड पडल्यास जास्तीत जास्त तापमान राहिल्यास साधारण ३५ अंश च्या वरती ४०,००० रुपये.
तसेच २.५ मि.मी तसेच कमी प्रमाणात पाऊस झाला तर तोही खंड समजला जाईल.
५ ) विमा संरक्षण प्रति हेक्टरी ८०,००० रुपये राहील.
६ ) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ४००० ते ८००० रुपये प्रति हेक्टर राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमा हफ्ता ५ टक्क्यांच्या पर्यादित असतो,विमा हफ्ता दर प्रत्येक जिल्ह्यात वेग वेगळा असतो.
७ ) पीक कर्ज घेणाऱ्या आणि न घेणाऱ्यांसाठी योजने सहभाग घेता येणार आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार असून पुढे लिंक दिली आहे – www.pmfby.gov.in