कृषी लक्ष्मी । ४ जानेवारी २०२३ ।सध्या कपासच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तेलंगणा राज्यात मागील काही दिवसांमध्ये कापसाचे 15 हजार रुपये क्विंटलवर गेले होते.
आता या ठिकाणी कापसाला सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे.
15 हजार रुपयांनी विक्री होणारा कापूस सध्या तेलंगणात पाच हजारांवर आला आहे. त्यामुळं तेलंगणा राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तेलंगणात प्रति क्विंटल 6000 रुपये दरानं कापसाची विक्री केली जात आहे.
कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी कापसाला वाढीव दर देण्याची मागणी करत आहेत.