कृषी लक्ष्मी I १६ डिसेंबर २०२२ I खानदेशात यंदा झालेला ११० टक्के पाऊस, सिंचन प्रकल्पात असलेला पाणीसाठा या बळावर यंदाचा रब्बी हंगाम अधिक उत्पादन देणारा असेल, असे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५३ हजार ६८० हेक्टरवर (६४ टक्के) रब्बीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. धुळ्यातही सुमारे ५० हजार हेक्टरवर तर नंदुरबारात सुमारे ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा, ज्वारीची मागणी पाहता ज्वारी, मका पिकांच्या अधिक हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.