कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I जिल्हाभरात आतापर्यंत एकूण ७८ जनावरे लम्पी स्कीनबाधितआढळली आहेत. त्यातील १२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्पत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार एकूण २ लाख ३५ हजार पशुपालकांकडे पशुधन आहे. २ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, ढोकमळे, नेवरे, सडये येथील ४ जनावरे बाधित आढळली.